Magle Tyala Shettale Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं योजना आपल्या दारी या वेबसाईटवर आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी सरकारने नागरिकांसाठी नवीन योजना राबवली आहे मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत ही योजना राबवली आहे शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान देखील मिळणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो आम्ही तुमच्यापर्यंत दररोज असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो आणि तुम्हाला देखील असेच नवनवीन अपडेट करायचे असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जेणेकरून तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल महाराष्ट्र सरकारच्या मागील त्याला शेततळे योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे चला तर या योजनेची वैशिष्ट्ये पात्रता जाणून घेऊया
महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमध्ये शेतकरी आपल्या शेतात शेततळे खोदून पाण्याची साठवणूक करू शकतात यासोबतच पिकांना आवश्यक पाणी पुरवू शकतात त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी राबवली आहे त्यामुळे होईल तेवढे या योजनेचा लाभ घेता येईल याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे कारण आपल्यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे
योजनेची वैशिष्ट्ये
मित्रांनो यामध्ये शासनाकडून 75 हजार रुपये पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे शेततळे खोदकामासाठी झालेला संपूर्ण खर्च शासनाकडून परतावा आपल्याला मिळणार आहे आणि जमिनीची गुंतवणूक करण्याची गरज नाहीये आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे देखील सोपे आणि सुलभ आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण यामध्ये येणार नाहीये
पात्रता
या योजनेमध्ये मागील त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 60 गुंठे म्हणजेच एकरापेक्षा जास्त स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे जमिनीचा सातबारा आणि आधार कार्ड जमिनीचा आठ अ उतारा रहिवासी प्रमाणपत्र आणि बँक पासबुक चे झेरॉक्स ही कागदपत्रे यामध्ये सादर करावी लागणार आहेत कारण आवश्यक कागदपत्रे जाहीर केल्याशिवाय आपल्याला या योजनेचा लाभ मिळणे शक्य नाहीये त्यामुळे आपल्याकडे हे कागदपत्र असणे आवश्यक आहे
अर्जाची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला Mahadbt वेब पोर्टल वर नोंदणी करावी लागते यासाठी वरील कागदपत्रे हाती असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला नोंदणी झाल्यानंतर शेतकरी यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून किंवा आधार कार्ड नंबर वापरून लॉगिन करू शकतात त्यानंतर आधार कार्ड द्वारे लॉगिन करताना मोबाईल नंबर वर येणाऱ्या ओटीपी ची मदत घ्यावी लागते त्यानंतर लॉगिन केल्यानंतर शेतकऱ्याने मागील त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज भरावा लागेल अर्जात विविध माहिती भरावी लागते जसे की शेताची माहिती बँक खात्याची माहिती इत्यादी मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे
यासोबतच शेतकऱ्याने भरलेल्या अर्जाची छाननी केली जाईल जर सर्व माहिती बरोबर असेल तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले शेत आणि पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करावे आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि त्यांच्या जीवन मानातही सुधारणा होईल त्यामुळे शेतकऱ्यांना काहीही अडचण येणार नाही
कारण ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेली आहे कारण उन्हाळा दिवसामुळे त्यांना पाण्याची गरज असते त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि यामध्ये काही अडचण आली तरीही तुम्ही आम्हाला विचारू शकता